Ad will apear here
Next
मनोहर जोशी, बोमन इराणी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन..... 
......
ज्येष्ठ नेते मनोहर जोशी :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा दोन डिसेंबर १९३७ हा जन्मदिन. शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.

प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. राजकारणाप्रमाणेच व्यवसायातही यश मिळवून त्यांनी कोहिनूरची उंची गाठली. उद्योग क्षेत्रातील आपल्या अनुभवावर आधारीत ‘धंदा कसा करावा’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

१४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ ते २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर २००२ ते २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ‘शिवसेना - काल-आज-उद्या’ हे मनोहर जोशी यांनी लिहिलेले पुस्तक हे शिवसेना या अफाट संघटनेचे चरित्रलेखन आहे. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. १९६७ एप्रिलमध्ये मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढउतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

अभिनेते बोमन इराणी :
हिंदी चित्रपटसृष्टीत उशीरा आगमन करूनही, अल्पावधीत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर गारुड करणारे अभिनेते बोमन इराणी यांचा दोन डिसेंबर १९४९ हा जन्मदिन. ते इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते आहेत, ज्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या करिअरला सुरुवात केली.

 बालपणापासूनच अभिनयात रुची असलेल्या बोमन यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेटर आणि हॉटेल स्टाफची नोकरी केली होती. मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करुन त्यांनी प्रसिद्ध ताजमहल पॅलेस अँड टॉवरमध्ये वेटर म्हणून नोकरी सुरु केली होती. काही वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी आपल्या आईला बेकरी सांभाळण्यात मदत केली. १९८१ ते १९८३ याकाळात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 

बोमन इराणी हे  बलराज सहानी, अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. १९८७ मध्ये त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. याच काळात बोमन यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. २००० साली राहुल बोस दिग्दर्शित ‘एव्हरीवन सेज आय एम फाइन’ या सिनेमात त्यांनी पहिली संधी मिळाली. २००३ मध्ये रिलीज झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता.

मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोंसला, वक्त, नो एंट्री, थ्री इडियट्स, वीर-जारा, मैंने गांधी को नहीं मारा, लक्ष्य, हनीमून ट्रैवल्स प्रा. लि., सॉरी भाई, पेज-3, माय वाइफ्ज मर्डर, फेरारी की सवारी यासह मराठीतील ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेत बोमन इराणी यांनी धमाल उडवली होती. 

- संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZECH
Similar Posts
अजित आगरकर, दादा साळवी, मोतिलाल क्रिकेटपटू अजित आगरकर, मराठी चरित्र अभिनेते दादा साळवी आणि हिंदी अभिनेते मोतिलाल यांचा चार डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत २६ नोव्हेंबर हा भारतातील धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन आणि ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय.....
आशा काळे, अमृता खानविलकर, रझा मुराद, गीता दत्त मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उत्तम नर्तिका आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते रझा मुराद, गायिका गीता दत्त यांचा २३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language